Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासा; जागा उपलब्धतेसाठी प्रशासन हालचालीत; अंकिता पाटील-ठाकरे यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासा; जागा उपलब्धतेसाठी प्रशासन हालचालीत; अंकिता पाटील-ठाकरे यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

इंदापूर: इंदापूर तालुक्यात घरकुल मंजूर होऊनही केवळ जागेअभावी हक्काच्या घरापासून वंचित असलेल्या शेकडो बेघर कुटुंबांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी या गंभीर प्रश्नावर पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली, ज्यानंतर प्रशासनाने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

जागेअभावी प्रलंबित घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
तालुक्यात अनेक गरीब लाभार्थ्यांना शासनाकडून घरकुले मंजूर झाली आहेत; मात्र स्वतःची जागा नसल्याने ही घरे केवळ कागदावरच राहिली आहेत. अंकिता पाटील ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष याकडे वेधले की, हक्काची जागा नसल्यामुळे बांधकामास सुरुवात करता येत नाही. गायरान आणि गावठाणातील शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया अधिक जलदगतीने राबवावी, अशी आग्रही मागणी त्यांनी या बैठकीत केली.

‘घराचा हक्क’ हा मूलभूत अधिकार
“गरीब आणि वंचित कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. केवळ तांत्रिक अडचणींमुळे गरीबांचे घराचे स्वप्न भंगू नये,” असे ठाम मत अंकिता पाटील ठाकरे यांनी व्यक्त केले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी हा प्रश्न निकाली काढणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. या सकारात्मक प्रतिसादामुळे इंदापूरमधील शेकडो कुटुंबांना लवकरच स्वतःची घरे मिळण्याची शक्यता आहे.

बैठकीतील उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीस पुणे जिल्हा परिषद सदस्या निर्मला मिसाळ आणि सामाजिक कार्यकर्ते सागर मिसाळ उपस्थित होते. लोकप्रतिनिधींच्या या पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला घरकुलांचा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!