Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gram Panchayat Administrator: सरपंचांना हायकोर्टाचा झटका! प्रशासक म्हणून मुदतवाढ मिळाली, पण ‘या’ अधिकारांना लावली कात्री

Gram Panchayat Administrator: सरपंचांना हायकोर्टाचा झटका! प्रशासक म्हणून मुदतवाढ मिळाली, पण ‘या’ अधिकारांना लावली कात्री

Gram Panchayat Administrator: राज्यातील सुमारे 14,500 ग्रामपंचायतींच्या प्रशासक नियुक्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला असला तरी, प्रशासक म्हणून काम पाहणाऱ्या माजी सरपंचांच्या पंखांना मात्र कात्री लावली आहे. आता या प्रशासकांना कोणतेही मोठे धोरणात्मक किंवा आर्थिक निर्णय घेता येणार नाहीत.

नेमका निकाल काय?
न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि अभय मंत्री यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, निवडणुका होईपर्यंत माजी सरपंचांना प्रशासक म्हणून कामकाज पाहता येईल. मात्र, ही नियुक्ती केवळ दैनंदिन प्रशासकीय सोयीसाठी आहे. या काळात त्यांना खालील मर्यादा पाळाव्या लागतील:

आर्थिक मर्यादा: केवळ अत्यावश्यक सेवा, जसे की कर्मचाऱ्यांचे पगार, वीज बिल आणि पाणीपुरवठा यांसाठीच खर्च करता येईल.
धोरणात्मक बंदी: ग्रामपंचायतीच्या भविष्यावर परिणाम करणारे कोणतेही नवीन धोरण किंवा मोठे आर्थिक करार (Tenders) त्यांना मंजूर करता येणार नाहीत.
अतिरिक्त लाभ नाही: प्रशासक म्हणून काम करताना त्यांना कोणतेही विशेष मानधन किंवा अतिरिक्त अधिकार मिळणार नाहीत.

राज्य सरकारचा ‘GR’ आणि आक्षेप
महाराष्ट्र सरकारने 20 फेब्रुवारी 2026 रोजी एक शासन निर्णय (GR) काढून, कार्यकाळ संपलेल्या 14,500 ग्रामपंचायतींवर निवडणुका होईपर्यंत किंवा पुढील 6 महिन्यांसाठी माजी सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. या निर्णयाला लोकशाही तत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगत याचिकाकर्त्यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. लोकशाहीत लोकनियुक्त प्रतिनिधींऐवजी अशा नियुक्त्या करणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

पुढील सुनावणी आणि सरकारची बाजू
राज्य सरकारने न्यायालयात असा युक्तिवाद केला की, जर सरपंचांना पदभार दिला नाही, तर हजारो ग्रामपंचायती नेतृत्वहीन होतील आणि ग्रामीण विकास ठप्प होईल. न्यायालयाने आता सरकारला 27 मार्च पर्यंत यावर सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. औरंगाबाद आणि कोल्हापूर खंडपीठांतर्गत दाखल झालेल्या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता असून, न्यायालयाचा अंतिम निर्णय काय असेल, याकडे आता संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!