Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

घरगुती वीज ग्राहकांना फायदा, वीजेची कुठलाही दरवाढ नाही, 2030 पर्यंत दरकपात होणार; आदेश जारी

घरगुती वीज ग्राहकांना फायदा, वीजेची कुठलाही दरवाढ नाही, 2030 पर्यंत दरकपात होणार; आदेश जारी

मुंबई : महावितरणच्या 2025-26 ते 2029-30 या पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश आज प्रसिद्ध केला आहे. महावितरणने (MSEB) पाच वर्षात वीजदर (Electricity) कपातीसाठी मांडलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांसाठीचे वीजदर 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार आहेत. कोणत्याही प्रवर्गात वीजदर वाढणार नाहीत. महावितरणच्या याचिकेवर आयोगाने गेल्या वर्षी मार्च अखेरीस एक आदेश दिला होता. त्या आदेशाला स्थगिती देण्यात आली होती.

महावितरणच्या पुनर्विचार याचिकेनुसार आयोगाने जून 2025 मध्ये एक आदेश दिला होता. त्या आदेशाला काहीजणांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर बोट ठेऊन जूनचा आदेश रद्द केला होता. सर्वोच्च न्यायालयानेही नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे पालन करून व तांत्रिक बाबी पूर्ण करून आदेश देण्याची सूचना नोव्हेंबरमध्ये केली होती. त्यानुसार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या पुनर्विचार याचिकेवर जनसुनावणी करून, नैसर्गिक न्याय तत्त्वाचे पालन करून व सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून आता आदेश दिला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले आहे. तसेच आता 2030 पर्यंतच्या वीजदराबाबत स्पष्टता आली आहे.

आयोगाने पाच वर्षांसाठी दिलेल्या आदेशापैकी 1 एप्रिल 2026 पासून दुसरे वर्ष सुरू होत आहे. परिणामी वीज ग्राहकांना यापूर्वीच्या दरापेक्षा अधिक सवलत मिळणार आहे. उदाहरणार्थ स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांना सकाळी 9 ते दुपारी 5 या कालावधीसाठीच्या वीजवापरासाठी प्रति युनिट 80 पैसे सवलत मिळत होती ती आता 2026 –27 या आर्थिक वर्षात 85 पैसे प्रति युनिट इतकी सवलत असेल. उद्योगांना व व्यावसायिक वीज ग्राहकांना सकाळी 9 ते दुपारी 5 या कालावधीतील वीज वापरासाठीची टीओडी सवलत चालूच राहणार आहे. या ग्राहकांना वीजदरात एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात 15 टक्के तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यात 25 टक्के सवलत मिळणार आहे. परिणामी उत्पादनासाठीच्या महत्त्वाच्या पहिल्या पाळीत त्यांना सवलतीच्या दराने वीज मिळेल.

1 एप्रिल 2026 पासून आदेशाचे दुसरे वर्ष सुरू होत असल्याने वीजदरात आणखी कपात होणार आहे.

महिना शंभर युनिटपर्यंत वीज ग्राहकांसाठीचा सरासरी दर 7 रुपये 31 पैशावरून कमी होऊन 7 रुपये 10 पैसे होईल. या ग्राहकांसाठीचा वीजदर पाच वर्षात 26 टक्के इतका कमी होणार आहे. नवा बहुवार्षिक वीजदर आदेश येण्यापूर्वी 2025 पर्यंत हा दर 8 रुपये 14 पैसे होता.

शंभर ते तीनशे युनिट वापर असलेल्या ग्राहकांसाठीचा दर 13 रुपये 17 पैसे यावरून कमी होऊन 12 रुपये 94 पैसे होईल. नवा बहुवार्षिक वीजदर आदेश येण्यापूर्वी 2025 पर्यंत हा दर 13 रुपये 23 पैसे होता.

उच्च दाब औद्योगिक ग्राहकांसाठीचा दर 10 रुपये 78 पैसे यावरून कमी होऊन 10 रुपये 71 पैसे इतका होईल. नवा बहुवार्षिक वीजदर आदेश येण्यापूर्वी 2025 पर्यंत हा दर 10 रुपये 88 पैसे होता.

वरीलप्रमाणे सर्व वीज ग्राहकांसाठीचे दर कमी होणार आहेत. तसेच 2029 -30 या आर्थिक वर्षापर्यंत ते दरवर्षी १ एप्रिल रोजी आणखी कमी होत जातील.

आयोगाने या आदेशात उच्चदाब व लघुदाब विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनसाठी 2026 -27 या वर्षासाठी 9 रुपये 50 पैसे प्रति युनिट दर निश्चित केला आहे. हा दर 2028 -29 पर्यंत स्थिर राहणार आहे. त्यामुळे विद्युत वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळेल. हाऊसिंग सोसायट्या आपल्या आवारात विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी लघुदाब केंद्र सुरू करू शकतात. घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांच्या सवलती कायम राहणार आहेत. नव्या दर रचनेत त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!