Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नागपूर हादरले! बॉयफ्रेंडला व्हिडिओ कॉल करत नर्सिंग विद्यार्थिनीची आत्महत्या; प्रेमप्रकरणातून टोकाचा निर्णय?

नागपूर हादरले! बॉयफ्रेंडला व्हिडिओ कॉल करत नर्सिंग विद्यार्थिनीची आत्महत्या; प्रेमप्रकरणातून टोकाचा निर्णय?

Nagapur Crime News : नागपूरच्या हिंगणा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डीएनडी हाइट्समध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय विध्येश्वरी आपटे या नर्सिंगच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, तिने आत्महत्येपूर्वी आपल्या बॉयफ्रेंडला व्हिडिओ कॉल केल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विध्येश्वरी ही आकार नर्सिंग कॉलेजमध्ये अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती. ती मैत्रिणींसोबत फ्लॅटमध्ये राहत होती. घटनेच्या दिवशी मैत्रिणी पदवीदान कार्यक्रमाला गेल्या असताना ती घरी एकटीच होती. याचदरम्यान तिने गळफास घेत आत्महत्या केली.

दोन दिवसांपूर्वी बॉयफ्रेंडचे दुसऱ्या तरुणीसोबत लग्न झाल्यामुळे ती मानसिक तणावात होती, अशी प्राथमिक माहिती आहे. या नैराश्यातूनच तिने टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!