Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नागपुरात खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर

नागपुरात खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर

Prashant Padole Nagpur Accident : काँग्रेसचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा नागपूरमध्ये पहाटे भीषण अपघात झाला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला जात असताना त्यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

प्राथमिक माहितीनुसार, खासदार पडोळे हे सुरक्षारक्षक आणि चालकासह नागपूर विमानतळाकडे निघाले होते. यावेळी नागपूर जिल्ह्यातील हल्दीरामसमोर ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघात गंभीर असला तरी सुदैवाने ते थोडक्यात बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघातानंतर त्यांनी एका दुचाकीस्वाराची मदत घेत नागपूर गाठले. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ते नियोजितप्रमाणे दिल्लीकडे रवाना झाले. काही महिन्यांपूर्वीही त्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता, ही त्यांची दुसरी घटना आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

केमिकल टँकर पलटी; परिसरात भीतीचे वातावरण

रत्नागिरी जिल्ह्यातील भोस्ते घाटात रविवारी संध्याकाळी केमिकलने भरलेला टँकर पलटी झाल्याची घटना घडली. लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतून इथाइल ऍसिटेट घेऊन मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला.

टँकरमध्ये ज्वलनशील रसायन असल्याने अपघातानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि कंपनीची सेफ्टी टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी दक्षता घेत टँकरमधील रसायन दुसऱ्या टँकरमध्ये सुरक्षितपणे हलवले.

पहाटेपर्यंत अपघातग्रस्त टँकर रस्त्याच्या कडेला हटवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!