Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Kalpana Kharat Lookout Notice: भोंदू अशोक खरातच्या पत्नीच्या अडचणीत वाढ! कल्पना खरातविरुद्ध ‘लुकआऊट’ नोटीस; परदेशात पळण्याचे मार्ग बंद

Kalpana Kharat Lookout Notice: भोंदू अशोक खरातच्या पत्नीच्या अडचणीत वाढ! कल्पना खरातविरुद्ध ‘लुकआऊट’ नोटीस; परदेशात पळण्याचे मार्ग बंद

Kalpana Kharat Lookout Notice: महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली असून, आता त्याच्या कुटुंबावरही कायद्याचा फास आवळला जात आहे. खरातची पत्नी कल्पना खरात हिच्याविरुद्ध शिर्डी पोलिसांनी ‘लुकआऊट’ नोटीस (Lookout Notice) जारी केली आहे. यामुळे तिला आता देशाबाहेर पळून जाणे अशक्य झाले असून सर्व विमानतळांवर तिची माहिती प्रसारित करण्यात आली आहे.

सावकारी पाश आणि फसवणुकीचा गुन्हा
अशोक खरात केवळ आध्यात्मिक भोंदूपणाच नाही, तर बेकायदेशीर सावकारीचा व्यवसायही करत होता. शिर्डीतील रावसाहेब गोंदकर या शेतकऱ्याला व्याजाच्या जाळ्यात ओढून त्यांची 4 एकर जमीन हडप केल्याचा आरोप खरात दांपत्यावर आहे. याप्रकरणी खरातसह त्याची पत्नी कल्पना आणि इतर तीन मध्यस्थांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणूक व सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

कल्पना खरात फरार; पोलिसांची कडक कारवाई
गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात ही पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाली आहे. यापूर्वी अशोक खरातनेही परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, जो पोलिसांनी हाणून पाडला. त्याच धर्तीवर कल्पना खरात देखील विदेशी प्रवासाचा आधार घेऊ शकते, ही शक्यता ओळखून पोलिसांनी तातडीने लुकआऊट नोटीस काढली आहे.

या प्रकरणातील इतर आरोपी
जमीन बळकावल्याच्या या प्रकरणात खरात दांपत्यासोबतच अरविंद बावके, किरण सोनावणे आणि अशोक तांबे यांच्यावरही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सावकारी पाशात ओढून सर्वसामान्यांच्या जमिनी बळकावण्याचे मोठे रॅकेट खरात चालवत असल्याचे तपासात समोर येत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!