Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Rain: पुण्यात पावसाचा धुमाकूळ; सोसाट्याचा वारा, विजेचा कडकडाच अन् ढगांचा गडगडाच, नागरिांची उडाली धांदल

Pune Rain: पुण्यात पावसाचा धुमाकूळ; सोसाट्याचा वारा, विजेचा कडकडाच अन् ढगांचा गडगडाच, नागरिांची उडाली धांदल

Pune Rain: शहरासह उपनगरात दुपारी पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांना असह्य उकाड्यापासून दिलासा मिळाला. सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव, खराडी भागांत गारांसह पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली. अनेकांनी पावसात भिजण्यापेक्षा रस्त्याच्या कडेला आडोशामध्ये थांबणे पसंत केले. शहरात सोमवारपासून गारांसह मुसळधार पाऊस पडत आहे. दररोज दुपारपर्यंत वातावरण गरम असते. त्यानंतर पावसाला सुरुवात होते. अशा वातावरणामुळे पावसाळा सुरु झाल्यासारखे पुणेकरांना वाटू लागले आहे.

आठवड्यात दुसऱ्यांदा गारांंचा पाऊस-

मंगळवारी आकाश दिवसभर ढगाळ होते. पण, पावसाने विश्रांती घेतली. बुधवारी शहरासह जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. उकाड्यातही वाढ झाली होती. दुपारनंतर तीनच्या सुमारास वारा सुटला आणि उपनगरांमध्ये हलक्या सरी पडल्या. तर आज दुपारपर्यंत उकाडा जाणवत होता. त्यानंतर अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. कात्रज-सातारा रस्त्यावर गारा पडत असताना कोथरूड, कर्वेनगर- कर्वे रस्त्यावर ऊन पडले होते. तासाभरानंतर तिथे पावसाला सुरुवात झाली. तर डेक्कन-शिवाजीनगर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. वातावरणातील बदलामुळे हवेत गारवा वाढला होता. काल रात्री साडेआठपर्यंत शहरात ०.४ मिलिमीटर तर लोहगावमध्ये ३२.६ मिलिमीटर पाऊस पडला. या हंगामात एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा गारांसह पावसाची नोंद झाली.

पावसाची शक्यता-

पुणे शहरात पुढील दोन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात थोडी वाढ होणार आहे. आकाश दुपारनंतर ढगाळ राहून संध्याकाळी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे शहराला भारतीय हवामानशास्त्र विभागाने येलो अलर्ट जाहीर केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!