Today शनिवार, 2nd मे 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat : अशोक खरातच्या मुलावर SITची प्रश्नांची सरबत्ती; नवे धक्कादायक खुलासे समोर

Ashok Kharat : अशोक खरातच्या मुलावर SITची प्रश्नांची सरबत्ती; नवे धक्कादायक खुलासे समोर

Ashok Kharat : राज्यात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासादरम्यान मोठे खुलासे समोर येत आहेत. विशेष तपास पथकाने (SIT) खरातच्या मुलाची सखोल चौकशी करत अनेक धक्कादायक प्रश्न विचारले. वडील तंत्र-मंत्र करत होते का? त्यांना भेटायला कोण-कोण येत होते? घरातील आर्थिक व्यवहार कसे चालत होते? परदेश दौऱ्यांमागचे कारण काय? अशा अनेक मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली.

मात्र या सर्व प्रश्नांना मुलाने “सर्व डॅडलाच माहिती” असे एकच उत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे. तरीही त्याने “घरात मोठ्या प्रमाणात कॅश यायची” अशी महत्त्वाची कबुली दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या कबुलीमुळे हवाला व्यवहारांचा संशय अधिक बळावला आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. खरातची पत्नी कल्पना खरात सध्या फरार असून तिचा शोध सुरू आहे. शिर्डी पोलिसांनी तिच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. SITने तिच्या माहेरच्या नातेवाईकांचीही चौकशी केली आहे.

माहितीनुसार, कल्पना खरात गेल्या १६ वर्षांपासून माहेराशी संपर्कात नसल्याचे उघड झाले आहे. तिच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!