मुंबई : सध्या बॉक्स ऑफिसवर अद्यापही धुरंधर सिनेमाचीच चलती आहे. ज्यामुळे मोठे कलाकारही आपले चित्रपट वाचवण्यासाठी धडपडत आहेत. याच संदर्भात, बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि ज्येष्ठ दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या बहुप्रतिक्षित ‘भूत बंगला’ चित्रपटाबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. मूळतः १० एप्रिल रोजी रिलीज होणार असलेला हा चित्रपट आता १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटाचे प्रचंड बॉक्स ऑफिस यश आणि प्रचंड क्रेझ लक्षात घेता ‘भूत बंगला’च्या निर्मात्यांनी आपला निर्णय बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट आता १० तारखेऐवजी १७ एप्रिल रोजी रिलीज होईल. ‘धुरंधर’च्या त्सुनामीपासून वाचण्यासाठी आणि स्वतंत्रपणे रिलीज होण्याचा फायदा मिळावा या आशेने निर्मात्यांनी ही अधिकृत घोषणा केली आहे.
अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ला पुढे ढकलण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे ‘धुरंधर २’ ला मिळालेला प्रतिसाद, ज्यामुळे मागील सर्व विक्रम धोक्यात आले आहेत. निर्मात्यांनी सोशल मीडियावर लिहिले, आमच्या वितरक आणि चित्रपटगृह मालकांशी चर्चा केल्यानंतर, आम्ही ‘भूत बंगला’साठी प्रदर्शनाची नवीन तारीख निश्चित केली आहेय १६ एप्रिल, ज्याचा पहिला शो रात्री ९ वाजता सुरू होईल. ‘धुरंधर: द रिव्हेंज’ची जबरदस्त कामगिरी आमच्या चित्रपटसृष्टीसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे, असल्याचेही म्हटले आहे.


