Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Accident: पुणे-बेंगळुरू महामार्गावर जांभुळवाडी पुलावर भीषण अपघात; क्रेन घेऊन जाणाऱ्या ट्रेलरचा चक्काचूर, चालक-क्लिनर…

Pune Accident: पुणे-बेंगळुरू महामार्गावर जांभुळवाडी पुलावर भीषण अपघात; क्रेन घेऊन जाणाऱ्या ट्रेलरचा चक्काचूर, चालक-क्लिनर…

Pune Accident: पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज नवीन बोगदा परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. जांभुळवाडी दरी पुलावर दोन अवजड ट्रेलर एकमेकांना धडकल्याने झालेल्या या अपघातात क्रेनचा लोखंडी भाग थेट केबिनमध्ये घुसल्याने चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत.

भीषण धडक; केबिनचा चक्काचूर
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही ट्रेलर क्रेनचे अवजड सुटे भाग घेऊन कात्रज बोगद्याकडून नवले पुलाच्या दिशेने जात होते. या मार्गावरील तीव्र उतारावर पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने पुढच्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी वेगवान होती की, पाठीमागच्या ट्रेलरवर असलेला क्रेनचा वजनदार लोखंडी भाग वेगामुळे सरकला आणि थेट चालकाच्या केबिनमध्ये घुसला. यामुळे केबिनचा अक्षरशः चुराडा झाला असून मोठी जीवितहानी टळली असली तरी चालक-क्लिनर जखमी झाले आहेत.

‘ब्लॅक स्पॉट’वर पुन्हा अपघात
कात्रज बोगदा ते नवले पूल हा टप्पा वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. या भागातील तीव्र उतारामुळे अनेकदा वाहनांचे ब्रेक निकामी होतात किंवा वेग नियंत्रित करणे कठीण जाते. या अपघातातील दोन्ही वाहनांमध्ये क्रेनचे जड पार्ट्स असल्याने उतारावर त्यांचा वेग वाढला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

बचावकार्य आणि वाहतूक कोंडी
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रेलर बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग काही काळ मंदावला होता. तीव्र उतारावर वाहन चालवताना वेगावर मर्यादा ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!