Today बुधवार, 16th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Honey Singh Concert: मद्य, ड्रग्सचा प्रचार करणाऱ्या गाण्यांवर बंदी; हनी सिंगच्या पुण्यातील कॉन्सर्टला पोलिसांकडून कडक अटी

Honey Singh Concert: मद्य, ड्रग्सचा प्रचार करणाऱ्या गाण्यांवर बंदी; हनी सिंगच्या पुण्यातील कॉन्सर्टला पोलिसांकडून कडक अटी

Honey Singh Concert:  पंजाबी गायक हनी सिंग याच्या पुण्यात होणाऱ्या कॉन्सर्टबाबत पोलिसांनी कडक अटी घालून दिल्या आहेत. या कार्यक्रमात अमली पदार्थांचे गौरवगान करणारी गाणी सादर करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी आयोजकांना यासंदर्भात सूचना देत कार्यक्रम ‘स्वच्छ आणि मुलांसाठी योग्य’ ठेवण्यावर भर दिला आहे. खराडी परिसरात हा कॉन्सर्ट होणार असून, आधी एप्रिलच्या सुरुवातीला नियोजित असलेला कार्यक्रम पावसामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, कार्यक्रमातील गाण्यांच्या आशयाबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवले होते. त्यानंतर पोलिसांनी आयोजकांशी बैठक घेऊन काही गाण्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

विशेषतः मद्य, ड्रग्स किंवा अश्लीलतेचा प्रचार करणारी गाणी सादर करू नयेत, अशी अट घालण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान कोणतीही आक्षेपार्ह कृती किंवा दृश्य होऊ नये, यासाठी आयोजकांना खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांच्या या निर्णयामुळे कार्यक्रम अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आयोजकांनीही सर्व नियमांचे पालन करण्याचे आश्वासन पोलिसांना दिले असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!