नवी दिल्ली : सध्या अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्या आहेत. त्यांच्याकडून ग्राहकांच्या सुविधांकडे लक्ष दिले जाते. त्यात रिलायन्स जिओ सध्या आघाडीची नेटवर्क कंपनी बनत आहे. जिओकडून आता नवीन 339 चा प्लॅन आणला गेला आहे. ज्यांना पैशांचा पुरेपूर मोबदला हवा आहे, अशा ग्राहकांसाठी हा बेस्ट प्लॅन ठरत आहे.
नवीन 339 च्या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS मिळतात. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कॅलेंडर महिन्याची वैधता आहे. याव्यतिरिक्त, कंपनी या प्लॅनसोबत गूगल जेमिनी प्रो चे 18 महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन आणि 5TB (5000GB) क्लाउड स्टोरेज देत आहे, ज्यामुळे हा बाजारातील सर्वात अनोख्या प्लॅनपैकी एक बनला आहे. दरम्यान, सध्या बहुतेक रिचार्ज प्लॅन 28 दिवसांचे असतात, ज्यासाठी वर्षातून 13 वेळा रिचार्ज करावे लागते. मात्र, जिओचा हा 339 चा प्लॅन कॅलेंडर महिन्याची वैधता देतो.
जर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला रिचार्ज केले, तर पुढचा रिचार्ज त्यानंतरच्या 1 तारखेला होईल, मग तो महिना 30 दिवसांचा असो किंवा 31 दिवसांचा. यामुळे वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास दूर होतो.


