Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Indapur News: ‘आरोग्याशी तडजोड नाहीच!’ श्रीमंत ढोले यांनी आरोग्य केंद्रात घेतली ‘झाडाझडती’

Indapur News: ‘आरोग्याशी तडजोड नाहीच!’ श्रीमंत ढोले यांनी आरोग्य केंद्रात घेतली ‘झाडाझडती’

Indapur News: ग्रामीण भागातील शेवटच्या घटकाला त्याच्या गावातच दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे, हा त्यांचा अधिकार आहे आणि तो मिळवून देणे हा आमचा निर्धार आहे. कामात कोणतीही कुचराई किंवा रुग्णांची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही,” अशा कडक शब्दांत जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीमंत ढोले यांनी आरोग्य प्रशासनाला सुनावले आहे. इंदापूर तालुक्यातील काटी आणि निरवांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना (PHC) ढोले यांनी अचानक भेट देऊन तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला, ज्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली.

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ संकल्पनेवर भर
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या संकल्पनेतून श्रीमंत ढोले यांनी केंद्रातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. केवळ कागदोपत्री काम न करता प्रत्यक्ष सेवेचा दर्जा सुधारण्याच्या कडक सूचना त्यांनी यावेळी दिल्या. आरोग्य केंद्रातील सोयीसुविधा, स्वच्छता आणि औषधसाठा यांची त्यांनी स्वतः पाहणी केली. ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारांसाठी शहराकडे धाव घ्यावी लागू नये, यासाठी स्थानिक स्तरावरच सर्व सुविधा सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी ‘ऑन द स्पॉट’ व्हिडिओ कॉल
या भेटीदरम्यान ढोले यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांना थेट व्हिडिओ कॉल लावून केंद्रातील परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती दिली. यावेळी डॉ. हंकारे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित कर्मचाऱ्यांना ‘आदर्श आरोग्य केंद्र’ कसे असावे, याबाबत महत्त्वाच्या तांत्रिक सूचना दिल्या. तसेच केंद्रात येणाऱ्या रुग्णांशी आणि नागरिकांशी सुसंवाद राखण्याचे आवाहन करत प्रशासकीय शिस्त पाळण्याचे आदेश दिले.

कामचुकार कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा
आरोग्य केंद्रात डॉक्टरांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे ढोले यांनी स्पष्ट केले. “रुग्णांना उपचारांविना ताटकळत ठेवल्यास गंभीर कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच केंद्रात आवश्यक औषधांचा साठा, सर्पदंश किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीसाठी लागणारी इमर्जन्सी कीट नेहमी सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या. ग्रामीण जनतेशी सौजन्याने वागून त्यांना तत्पर सेवा देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांची उपस्थिती
या झाडाझडती दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी श्रीम. सुरेखा पोळ, पंचायत समितीचे गटनेते बापूसाहेब शेंडे, सोमनाथ वाघमोडे, साहेबराव मोहिते, विपुल वाघमोडे, दिगंबर निंबाळकर, विठ्ठल जाधव, विठ्ठल पवार, रणजीत रासकर, रवींद्र पोळ यांसह स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“आमचा निर्धार : आरोग्यदृष्ट्या समृद्ध मतदारसंघ”
“मतदारसंघाला आरोग्यदृष्ट्या समृद्ध करणे हे आमचे स्वप्न आहे. ग्रामीण रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हातात हात घालून काम करत आहेत. आरोग्य सेवा हा लोकांचा मूलभूत हक्क असून त्यात कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असं श्रीमंत ढोले यांनी म्हटलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!