Today बुधवार, 5th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Chandrashekhar Bawankule: ‘काँग्रेसला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही…’; बारामती पोटनिवडणुकीवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

Chandrashekhar Bawankule: ‘काँग्रेसला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही…’; बारामती पोटनिवडणुकीवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

Chandrashekhar Bawankule : “बारामतीची निवडणूक बिनविरोध करून काँग्रेसने राजकीय सुसंस्कृतपणा दाखवावा, अन्यथा त्यांचा असा भीषण पराभव करू की त्यांना पुन्हा तोंड दाखवायला जागा उरणार नाही,” अशा कडक शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्जाच्या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अजितदादांच्या नात्याची काँग्रेसला आठवण
बावनकुळे यांनी काँग्रेसला भावनिक आवाहन करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, अजितदादांनी आपल्या राजकीय आयुष्यातील मोठा काळ काँग्रेससोबत व्यतीत केला आहे. त्यामुळे किमान जुन्या संबंधांचा आदर राखून काँग्रेसने सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार उभा करू नये. बारामतीत ७५ टक्क्यांहून अधिक मतांनी महायुतीचा विजय निश्चित आहे. काँग्रेसने निवडणूक लढवलीच, तर त्यांचा ऐतिहासिक पराभव अटळ आहे.

भाजपच्या वर्धापन दिनी ‘५१ टक्क्यां’चा संकल्प
आज भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना बावनकुळे यांनी पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवर प्रकाश टाकला. राज्यात आणि देशात भाजपचे संघटन ५१ टक्क्यांहून अधिक नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर तरुणांना पक्षाशी जोडले जाईल. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बूथ पातळीपर्यंत पक्ष मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

भोंदू खरात प्रकरण: दोषी अधिकाऱ्यांची खैर नाही
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना बावनकुळे यांनी कडक भूमिका घेतली. “हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून सध्या एसआयटी (SIT) यावर काम करत आहे. तपासात जे अधिकारी दोषी आढळतील, त्यांना थेट बडतर्फ करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!