Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat: अशोक खरातविरोधात ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल; भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात

Ashok Kharat: अशोक खरातविरोधात ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल; भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात

Ashok Kharat Case : स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या आणि शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. यापूर्वीच 13 गुन्हे दाखल असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) उडी घेतली असून खरातविरोधात मनी लाँड्रिंगचा (Money Laundering) गुन्हा दाखल केला आहे.

अशोक खरातवर केवळ बलात्काराचेच नाही, तर फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचेही गंभीर आरोप आहेत. नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, ईडीने आता या आर्थिक गैरव्यवहाराच्या मुळाशी जाण्यासाठी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी जमा केलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे ईडीने आपल्या ताब्यात घेतली असून, खरातचे हे अफाट आर्थिक साम्राज्य नेमके कसे उभे राहिले, याची कसून चौकशी केली जाणार आहे.

देवेंद्र फडणवीसांचं अशोक खरात प्रकरणावर भाष्य
दरम्यान, रविवारी नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर कडक भाष्य केले होते. मुख्यमंत्री म्हणाले होते की, “अशोक खरात प्रकरणात एसआयटी (SIT) सखोल तपास करत आहे. तो रोजच्या रोज जाहीर करता येणार नाही. भोंदू अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्याच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे. ईडीने या प्रकरणाची माहिती घेतली आहे. त्यामुळे त्याची ईडी चौकशी केली जाणार आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. आता ईडीने अशोक खरातविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केल्याने त्याच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.

कल्पना खरातच्या अटकेसाठी तीन विशेष पथक रवाना
अशोक खरात याच्या अडचणीत दिवसागणिक भर पडत असतानाच, आता त्याची पत्नी कल्पना खरात हिच्या मुसक्या आवळण्यासाठी एसआयटीने (SIT) कंबर कसली आहे. कल्पना खरातच्या अटकेसाठी नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तीन विशेष पथकं रवाना करण्यात आली आहेत.

शिर्डी पोलीस ठाण्यात जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी कल्पना खरातवर गुन्हा दाखल आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू असली, तरी त्याची पत्नी फरार आहे. तर मुलगा हर्षवर्धनचा फोन ‘नॉट रिचेबल’ येत आहे. कल्पना खरातला अटक करण्यासाठी एसआयटी अत्यंत गोपनीयरीत्या तपास यंत्रणा राबवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!