Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Chandrapur News: लग्नातील आनंदावर विरजण! चंद्रपुरात मित्राच्या लग्नात नाचताना 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Chandrapur News: लग्नातील आनंदावर विरजण! चंद्रपुरात मित्राच्या लग्नात नाचताना 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे लग्नाचा उत्साह अवघ्या काही क्षणातच शोकात बदलला. गोंडपिपरी तालुक्यातील ‘फुरदीहेटी’ गावात मित्राच्या लग्नासाठी आलेल्या 25 वर्षीय तरुणाचा डीजेच्या तालावर नाचत असताना अचानक मृत्यू झाला. अल्पेश दहागावकर असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मस्करी करत असल्याचे वाटले, पण काळाने गाठले
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नसमारंभात सर्वजण डीजेच्या तालावर उत्साहाने नाचत होते. अल्पेशही आपल्या मित्रांसोबत आनंद साजरा करण्यात मग्न होता. मात्र, नाचता नाचता तो अचानक जमिनीवर कोसळला. सुरुवातीला उपस्थितांना वाटले की अल्पेश काहीतरी मस्करी करत आहे किंवा थकव्यामुळे खाली बसला असावा. मात्र, बराच वेळ होऊनही त्याने कोणतीही हालचाल केली नाही, तेव्हा सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला.

हृदयविकाराच्या झटक्याने ओढवला अंत?
घबरालेल्या मित्र आणि नातेवाईकांनी त्याला तातडीने गोंडपिपरी येथील सरकारी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका (Heart Attack) असल्याचे मानले जात आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी याप्रकरणी ‘अपघाती मृत्यू’ची नोंद केली आहे.

तरुण वयात हृदयविकाराचे प्रमाण का वाढतेय?
अलीकडच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बदललेली जीवनशैली, जंक फूडचे अतिसेवन, झोपेचा अभाव आणि वाढता मानसिक ताण ही यामागील प्रमुख कारणे आहेत. याव्यतिरिक्त धूम्रपान, मद्यपान आणि आनुवंशिक घटकांमुळेही ‘कार्डियाक अरेस्ट’चा धोका वाढतो. आनंदाच्या प्रसंगी अतिशारीरिक कष्ट किंवा मोठ्या आवाजाचा ताणही कधीकधी जीवावर बेतू शकतो, असे या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!