Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Buldhana Crime: बुलढाणा हादरलं! सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या नराधम मास्तराचं चिमुकलीसोबत नीच कृत्य

Buldhana Crime: बुलढाणा हादरलं! सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या नराधम मास्तराचं चिमुकलीसोबत नीच कृत्य

Buldhana Crime: बदलापूर प्रकरणाची जखम ताजी असतानाच, बुलढाणा जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. शाळेच्या पवित्र मंदिरात ज्ञान देणाऱ्या एका ५८ वर्षीय शिक्षकाने तिसरीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या नराधम शिक्षकाच्या कृत्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी शाळेवर चाल करून त्याला चांगलाच चोप दिला.

नेमकी घटना काय?
मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथील प्राथमिक शाळेत मंगळवारी सकाळी १०:३० च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. महादेव आत्माराम मानतोडे असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. या नराधमाने चिमुकलीसोबत गैरकृत्य केल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर संतापलेल्या महिला आणि पुरुषांच्या जमावाने शाळेला वेढा घातला आणि आरोपीला जाब विचारत मारहाण केली.

पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये ३ तास तणाव
घटनेची माहिती मिळताच डोनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संतप्त ग्रामस्थ आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यास तयार नव्हते. सुमारे तीन तास शाळेच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. अखेर पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढल्यानंतर आरोपीला पोलीस ठाण्यात हलवण्यात आले.

निवृत्तीला दीड महिना उरला असताना कृत्य
विशेष म्हणजे, आरोपी महादेव मानतोडे हा येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होता. सेवेचा काळ संपायला अवघा दीड महिना बाकी असताना, वयोवृद्ध शिक्षकाने केलेल्या या नीच कृत्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पवित्र नात्याला तडा गेला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!