Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Parth Pawar: पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ; गुलाबी जॅकेट घालून वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा

Parth Pawar: पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ; गुलाबी जॅकेट घालून वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा

Parth Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते पार्थ पवार यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आज गाठला गेला. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आज (९ एप्रिल २०२६) राज्यसभेचे सदस्य म्हणून अधिकृत शपथ घेतली. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाऊल ठेवताना पार्थ पवारांनी आपल्या वडिलांच्या स्मृतींना दिलेली मानवंदना आज चर्चेचा विषय ठरली.

पार्थ पवारांच्या पेहरावावर खिळल्या सर्वांच्या नजरा
आजच्या शपथविधी सोहळ्यात सर्वांच्या नजरा पार्थ पवारांच्या पेहरावावर खिळल्या होत्या. पार्थ यांनी यावेळी हुबेहूब अजित दादांच्या शैलीतील गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. अजित पवार आपल्या राजकीय कारकिर्दीत अशाच वैशिष्ट्यपूर्ण जॅकेटसाठी ओळखले जायचे. वडिलांच्या वारशाची आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीची आठवण करून देणारा हा पेहराव पार्थ यांच्या राजकीय वाटचालीत वडिलांचे छत्र सदैव सोबत असल्याचा संदेश देऊन गेला. या भावनिक पेहरावामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

दिल्लीत राष्ट्रवादीचा उत्साह
पार्थ पवार दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या स्वागतासाठी दिल्लीतील महत्त्वाच्या चौकांमध्ये भव्य बॅनर लावण्यात आले होते. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाने पार्थ पवारांवर दाखवलेला हा विश्वास आगामी काळात पक्षाला नवीन दिशा देणारा ठरेल, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

वडिलांचा वारसा पुढे नेण्याचे आव्हान
अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पार्थ पवार आता राष्ट्रीय राजकारणातून आपली छाप पाडणार आहेत. केवळ पेहरावातूनच नव्हे, तर कृतीतूनही ते वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे नेणार असल्याचा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. राज्यसभेच्या या शपथविधीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आता दिल्लीत एक तरुण आणि आक्रमक चेहरा मिळाला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!