Today सोमवार, 17th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune: पुणे पोलीस दलात खळबळ, भीती दाखवून महिला प्राचार्याकडून 7 लाख उकळले; 3 पोलिसांना दणका

Pune: पुणे पोलीस दलात खळबळ, भीती दाखवून महिला प्राचार्याकडून 7 लाख उकळले; 3 पोलिसांना दणका

Pune News: शहरातून पोलीस दलाची मान खाली घालवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला प्राचार्याला पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवत तब्बल 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात कठोर पावले उचलत मोठी कारवाई केली आहे.

बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील ‘रील स्टार’ सोनाली हिंगे यांचा समावेश आहे. यातील अजित बडे हे सध्या सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत होते, तर सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे सोनाली हिंगे ही सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध असून ती दामिनी मार्शल म्हणून काम करते.

अशी केली खंडणीखोरी
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिसांनी एका महिला प्राचार्याला लक्ष्य केले होते. तुमच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्हाला अटक केली जाईल, अशी भीती या पोलिसांनी त्यांना घातली. अटकेची भीती दाखवून कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्यांनी महिला प्राचार्यांकडे मोठ्या रकमेची मागणी केली.

पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई
पोलिसांकडूनच खंडणी उकळल्याचा हा प्रकार समोर येताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. खात्यांतर्गत चौकशी आणि पुराव्यांच्या आधारे तत्काळ बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलातील भ्रष्ट कारभारावर आयुक्तांनी मोठा प्रहार केला आहे. दामिनी पथक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा अशा गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!