Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सलग पाचव्यांदा निरा-भीमा कारखाना निवडणूक बिनविरोध; हर्षवर्धन पाटील गटाचे वर्चस्व कायम

सलग पाचव्यांदा निरा-भीमा कारखाना निवडणूक बिनविरोध; हर्षवर्धन पाटील गटाचे वर्चस्व कायम

इंदापूर: येथील निरा भीमा सहकारी सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ ते २०३०-३१ ची पंचवार्षिक निवडणूक संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली असून सलग पाचव्यावेळी ही परंपरा कायम राहिली आहे.

या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या २५ वर्षांत सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरूवार १३ मार्च रोजी चित्र स्पष्ट झाले असून पाटील गटाचे २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. हर्षवर्धन पाटील त्यांनी १९९९ मध्ये नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. या कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत गेल्या २५ वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. तसेच सध्या देशातील व राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत असल्याची जाण शेतकऱ्यांना आहे. या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यक्षेत्रातील ४६ गावांमधील सभासद, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी सहकार्याची भूमिका घेतली, त्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत.

बिनविरोध विजयी झालेले उमेदवार :

बावडा गट– हर्षवर्धन शहाजीराव पाटील, प्रतापराव सर्जेराव पाटील, उमेश अच्युतराव पाटील. पिंपरी गट-प्रकाश शहाजी मोहिते, संजय तुळशीराम बोडके, विजय दत्तात्रय घोगरे, सुरवड गट-महेशकुमार दत्तात्रय शिर्के, दादासाहेब उत्तम घोगरे, सुभाष किसन गायकवाड, काटी गट– लालासाहेब देविदास पवार, राजकुमार वसंतराव जाधव, विलास रामचंद्र वाघमोडे, रेडणी गट-आनंदराव नामदेव बोंद्रे, राजेंद्र व्यंकट देवकर, दत्तू यशवंत सवासे. अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्ग– राहुल अरुण कांबळे. इतर मागास प्रवर्ग- कृष्णाजी दशरथ यादव, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग– रामचंद्र नामदेव नाईक. ब वर्ग सभासद प्रवर्ग- भाग्यश्री हर्षवर्धन पाटील. महिला राखीव प्रवर्ग– संगीता दत्तात्रय पोळ, कल्पना निवृत्ती शिंदे.

या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे व त्यांना सहायक म्हणून इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी काम पाहिले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!