Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rohit Pawar: ‘हा हलगर्जीपणा योग्य नाही…’; भुजबळांच्या हेलिकॉप्टर लँडिंगवरून रोहित पवारांनी सरकारला सुनावडे खडेबोल

Rohit Pawar: ‘हा हलगर्जीपणा योग्य नाही…’; भुजबळांच्या हेलिकॉप्टर लँडिंगवरून रोहित पवारांनी सरकारला सुनावडे खडेबोल

Rohit Pawar: पुरंदर येथे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडऐवजी थेट कार पार्किंगमध्ये उतरवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गंभीर प्रकारानंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “आज केवळ नशिबामुळे छगन भुजबळ साहेबांचा अपघात टळला, पण शासनाने इतका हलगर्जीपणा करणे अत्यंत चुकीचे आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली संतापजनक प्रतिक्रिया नोंदवली आहे.

देखभालीवर प्रश्नचिन्ह
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमधून नेत्यांच्या हवाई प्रवासातील असुरक्षिततेकडे सर्वांचे लक्ष वेधले. छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे हेलिकॉप्टर तांत्रिक गोंधळामुळे पार्किंगमध्ये उतरवावे लागणे ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले. अनेक सरकारी विमाने आणि हेलिकॉप्टर्सची देखभाल-दुरुस्ती वेळेवर होत नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. अशा परिस्थितीत महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची तांत्रिक स्थिती तपासणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकारला जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न
लँडिंगचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रोहित पवार यांनी सरकारला अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. “आज मोठा अनर्थ टळला असला तरी, भविष्यात अशा चुकांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्या,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुरक्षा नियमांचे पालन आणि विमानांच्या देखभालीबाबत सरकारने कडक पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे. या घटनेमुळे राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (VVIP) हवाई प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासकीय स्तरावर याचे काय पडसाद उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!