Today शनिवार, 2nd मे 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

School Bus Fare : पालकांना दिलासा! स्कूल बसचे आगाऊ शुल्क बंद; सुरक्षिततेसाठी नवे कडक नियम लागू

School Bus Fare : पालकांना दिलासा! स्कूल बसचे आगाऊ शुल्क बंद; सुरक्षिततेसाठी नवे कडक नियम लागू

School Bus Fare : राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि पालकांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी परिवहन विभागाने स्कूल बस नियमावलीत महत्त्वाचे बदल प्रस्तावित केले आहेत.

नव्या मसुद्यानुसार, आता स्कूल बसकडून आगाऊ शुल्क घेण्यास बंदी घालण्यात आली असून, केवळ मासिक स्वरूपातच भाडे आकारणे बंधनकारक केले जाणार आहे. यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तसेच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक स्कूल बसमध्ये ‘डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टीम’ आणि ‘पॅनिक बटन’ बसवणे अनिवार्य करण्यात येणार आहे. याशिवाय व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस (GPS) आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणेही बंधनकारक असेल. पालकांना मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या मुलाचे लोकेशन पाहता येणार आहे.

या सुधारित नियमांमध्ये सीट बेल्ट सक्ती, तसेच पूर्व-प्राथमिक ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महिला अटेंडंट ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. बसमधील सर्व कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीही बंधनकारक असेल.

विद्यार्थ्यांच्या हालचालींची नोंद ठेवण्यासाठी डिजिटल हजेरी प्रणाली लागू केली जाणार असून, विद्यार्थी बसमध्ये कधी चढला आणि उतरला याची अचूक माहिती नोंदवली जाईल.

दरम्यान, शाळा परिवहन समितीला अधिक अधिकार देण्यात आले असून, बसचे शुल्क नियमानुसार घेतले जाते का यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. तसेच पालकांच्या तक्रारींचे निवारण करून त्रैमासिक अहवाल सादर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

या नियमांवर २४ एप्रिलपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या असून, नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर परवाना रद्द करण्याची कठोर कारवाई केली जाणार आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!