Today शनिवार, 2nd मे 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat Case : “शिजूका, नॉडी कोण?”; अशोक खरात प्रकरणात अंजली दमानिया यांचा नवा खुलासा

Ashok Kharat Case : “शिजूका, नॉडी कोण?”; अशोक खरात प्रकरणात अंजली दमानिया यांचा नवा खुलासा

Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदू बाबा प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत असताना, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे.

अशोक खरात याच्या कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) संदर्भात माहिती देताना दमानिया यांनी सांगितले की, त्याला “शिजूका” आणि “नॉडी” या नावांनी अनेक फोन कॉल्स येत होते. ट्रूकॉलरवर तपास केल्यानंतर ही नावे समोर आल्याचे त्यांनी सांगितले. खरातने काही नंबरना कोडवर्ड दिले असावेत, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात खरातची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार असून, तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. तिच्या नातेवाईकांपासून ते मैत्रिणी आणि घरातील नोकरांपर्यंत चौकशी करण्यात येत आहे. मात्र अद्याप ठोस माहिती हाती लागलेली नाही.

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अशोक खरात याने सोलापूर जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केल्याचे उघड झाले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात सुमारे ११ एकर जमीन तब्बल २.४० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली असून, या व्यवहारात त्याच्या पत्नीला कुलमुखत्यार अधिकार देण्यात आले होते.

या सर्व घडामोडींमुळे अशोक खरात प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनत असून, पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!