Today शुक्रवार, 6th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sugarcane Farmers Protest: ऊस बिलाच्या थकबाकीवरून रयत क्रांती संघटना आक्रमक; कारखान्याला आंदोलनाचा इशारा

Sugarcane Farmers Protest: ऊस बिलाच्या थकबाकीवरून रयत क्रांती संघटना आक्रमक; कारखान्याला आंदोलनाचा इशारा

Sugarcane Farmers Protest: इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची थकबाकी प्रलंबित असल्याने आता ‘रयत क्रांती संघटना’ मैदानात उतरली आहे. ऊस गाळप होऊन मोठा कालावधी उलटला तरी अद्याप हक्काचे पैसे मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाला निवेदन दिले असून, थकबाकी तात्काळ अदा करण्याची आग्रही मागणी केली आहे.

१४ दिवसांचा नियम धाब्यावर; शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष
साखर कारखानदारीच्या नियमानुसार, ऊस गाळपासाठी नेल्यानंतर १४ दिवसांच्या आत त्याचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित असते. मात्र, कर्मयोगी कारखान्याने अनेक शेतकऱ्यांची बिले अद्याप थकवल्याचा आरोप संघटनेने केला आहे. केवळ शेतकऱ्यांचीच नाही, तर ऊस तोडणी आणि वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांची देणीही प्रलंबित असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे. 20 एप्रिलपर्यंत ही थकबाकी न दिल्यास कारखाना परिसरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निलेश देवकर यांनी दिला आहे.

कारखाना प्रशासनाचे स्पष्टीकरण: १६ एप्रिलपासून पेमेंट सुरू होणार
रयत क्रांती संघटनेच्या इशाऱ्यानंतर कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याच्या प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट केली आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक रणजित तावरे यांनी सांगितले की, ऊस उत्पादक सभासदांचे ३१ जानेवारीअखेरपर्यंतचे ‘केन पेमेंट’ येत्या १६ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल. या स्पष्टीकरणामुळे काही प्रमाणात तणाव निवळण्याची शक्यता असली तरी, शेतकरी आता प्रत्यक्ष पैशांची प्रतीक्षा करत आहेत.

टप्प्याटप्प्याने थकबाकी निवारणाचे नियोजन
जानेवारीनंतर गाळपास आलेल्या ऊसाचे बिल आणि ऊस तोडणीधारकांची मस्टरनिहाय बिले २५ एप्रिलपर्यंत जमा केली जातील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ३० एप्रिलअखेरपर्यंत कारखान्याची सर्व थकबाकी पूर्ण करण्याचा मानस कार्यकारी संचालकांनी व्यक्त केला आहे. आता कारखान्याने दिलेल्या या नवीन तारखांनुसार शेतकऱ्यांचे पैसे मिळतात की रयत क्रांती संघटनेला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागते, याकडे संपूर्ण इंदापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!