Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Water Supply News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

Pune Water Supply News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

पुणे : महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारीतील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर पंपिंग येथे विद्युत विषयक देखभाल व दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. १६ ) बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी ही माहिती दिली. पाणीपुरवठा बंद असणाऱ्या भागांमध्ये पर्वती जलकेंद्राच्या अखत्यारीतील शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकूंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड ते एसएनडीटी, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डडाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सव्र्हे नंबर ४२ व ४६ कोंढवा खुर्द, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, तर वडगाव जलकेंद्र परिसरातील हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक या परिसराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.

चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र परिसरातील पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलनी, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ, वारजे हायवे, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड. नवीन होळकर पंपिंग परिसरातील विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड आणि लष्कर जलकेंद्र परिसराच्या अखत्यारीतील लष्कर भाग, पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!