Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Prakash Bhoite: ग्रामीण पत्रकारितेचा आवाज हरपला; प्रकाश भोईटे यांना हर्षवर्धन पाटील यांची श्रद्धांजली

Prakash Bhoite: ग्रामीण पत्रकारितेचा आवाज हरपला; प्रकाश भोईटे यांना हर्षवर्धन पाटील यांची श्रद्धांजली

Prakash Bhoite: ग्रामीण पत्रकारितेला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा आणि नवी ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे यांचे वयाच्या 62 व्या वर्षी सोमवारी (दि. 13) पुण्यात निधन झाले. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यासह पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्याकडून आठवणींना उजाळा
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भोईटे यांना श्रद्धांजली अर्पण करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. पाटील यांनी सांगितले की, “भोईटे यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील माझा एक अभ्यासू आणि जिवलग मित्र हरपला आहे.” 1995 च्या सुमारास कृषी राज्यमंत्री असताना भोईटे यांच्याशी झालेला परिचय पुढे घट्ट मैत्रीत रूपांतरित झाला. त्या काळापासून ते एक अत्यंत उत्साही, तळमळीचे आणि शेती प्रश्नांची जाण असलेले पत्रकार म्हणून ओळखले जात होते.

लेखणीतून ग्रामीण प्रश्नांना दिला न्याय
प्रकाश भोईटे यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत पुणे जिल्ह्यातील विविध प्रश्नांना आपल्या धारदार लेखणीतून वाचा फोडली. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडवण्यात त्यांचे मोठे कौशल्य होते. विशेषतः कृषी, सहकार आणि साखर उद्योगासारख्या तांत्रिक विषयांवर त्यांनी अत्यंत प्रभावी लेखन करत समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या बातम्यांचे मथळे हे नेहमीच वाचकांचे लक्ष वेधून घेणारे आणि विषयाची गंभीरता स्पष्ट करणारे असत.

शेतकरी आणि पत्रकारांच्या लढ्यातील नेतृत्व
केवळ बातम्या लिहिण्यापुरते मर्यादित न राहता, भोईटे यांनी शेतकरी आणि पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी नेहमीच पुढाकार घेतला. अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलने उभारून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. त्यांच्या जाण्याने ग्रामीण पत्रकारितेचा एक बुलंद आवाज कायमचा शांत झाला आहे, अशा शब्दांत हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!