Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात उष्णतेचा कडाका वाढला! पुढील दोन दिवस ‘हीट वेव्ह’ची शक्यता; IMDचा इशारा

पुण्यात उष्णतेचा कडाका वाढला! पुढील दोन दिवस ‘हीट वेव्ह’ची शक्यता; IMDचा इशारा

Pune Weather : पुणे शहरात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून पुढील दोन दिवस वातावरण अधिक तापदायक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) ने वर्तवला आहे. सध्या शहरात तापमान ४० अंशांच्या जवळ पोहोचले असून उपनगरांमध्ये ते ४१ अंशांपुढे गेले आहे.

गेल्या चार दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे उष्णतेची तीव्रता वाढली आहे. सकाळी ९-१० वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागतात, तर दुपारनंतर बाहेर पडणे कठीण होत आहे. संध्याकाळीही उकाडा कायम राहत असून रात्रीच्या तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे.

IMDने नागरिकांना उष्णतेपासून बचावासाठी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, हलके व सैल कपडे वापरणे आणि थेट उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने उष्णतेच्या पार्श्वभूमीवर तीन मानक कार्यपद्धती (SOP) जारी केल्या आहेत. यामध्ये विशेषतः रस्त्यावर काम करणारे कामगार, बांधकाम मजूर, वाहतूक पोलिस, डिलिव्हरी कर्मचारी यांच्यासाठी कामाचे वेळापत्रक बदलणे, पाण्याची व्यवस्था, विश्रांती आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत.

तसेच खाण कामगारांसाठी उष्णतेच्या ताण व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून थंड विश्रांती केंद्रे, वायुवीजन आणि जॉब रोटेशन यांसारख्या उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. गृहनिर्माण क्षेत्रातही थंड छप्पर, हरित क्षेत्रे आणि हवामानानुसार नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे.

एकूणच, पुढील काही दिवस उष्णतेचा कडाका कायम राहणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!