Today बुधवार, 4th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rain Alert : महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; विजांसह गारपिटीची शक्यता, विदर्भात उष्णतेचा कहर कायम

Rain Alert : महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; विजांसह गारपिटीची शक्यता, विदर्भात उष्णतेचा कहर कायम

Maharashtra Rain Alert : राज्यात येत्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून २० ते २२ एप्रिलदरम्यान अनेक भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन जोरदार सरी कोसळू शकतात. या काळात विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

१९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट भाग, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २० आणि २१ एप्रिलला पावसाचा विस्तार वाढणार असून पुणे विभाग, दक्षिण मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर परिसर) आणि अमरावती विभागातील काही भागांतही पावसाच्या सरी अपेक्षित आहेत.

दरम्यान, विदर्भात उष्णतेचा तडाखा कायम आहे. वर्धा येथे तापमानाने ४५ अंश सेल्सियसचा टप्पा गाठत या हंगामातील उच्चांक नोंदवला. नागपूरमध्ये ४४.२ अंश, अमरावतीत ४४.०, अकोला ४३.३, चंद्रपूर ४३.४, गोंदिया ४३.२ आणि यवतमाळ ४३.८ अंश तापमान नोंदवले गेले. उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने उकाड्याची झळ कायम आहे.

नागपूरमध्ये किमान तापमान २७.४ अंश, तर वर्ध्यात २७.८ अंश नोंदवले गेले. त्यामुळे दिवसभर उष्णतेचा त्रास होत असल्याने दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र, नागपूर आणि पूर्व विदर्भात सध्या पावसाची शक्यता कमी आहे. पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता असून त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळू शकतो.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!