Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

IPS Transfer : राज्यातील नऊ बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक जिल्ह्यांत फेरबदल

IPS Transfer : राज्यातील नऊ बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक जिल्ह्यांत फेरबदल

IPS Transfer : राज्यात पोलीस प्रशासनात मोठे बदल करत शासनाने नऊ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या फेरबदलामुळे सातारा, सांगली, गडचिरोली, कोल्हापूर, जळगाव यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असून कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नव्या आदेशानुसार तुषार दोषी यांची साताऱ्यावरून सांगली येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर निखिल पिंगळे यांची पुण्यातील पोलीस उपआयुक्त पदावरून साताऱ्यात पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. संदीप घुगे यांना सांगलीवरून मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपआयुक्त (सुरक्षा) म्हणून नेमण्यात आले आहे.

दरम्यान, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेले तुषार दोशी यांच्याबाबतही ही बदली महत्त्वाची मानली जात आहे.

गडचिरोली आणि कोल्हापूरमध्येही महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. योगेश गुप्ता यांना कोल्हापूरवरून गडचिरोली परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक (अतिरिक्त जबाबदारी) म्हणून नेमण्यात आले आहे. तर निलोत्पल यांची गडचिरोलीवरून कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. तसेच एम. रमेश यांना गडचिरोली येथे पदोन्नतीसह पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

गुन्हे अन्वेषण विभागातही बदल करण्यात आले असून महेश्वर रेड्डी यांची जळगाववरून पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली आहे. श्रीकांत धिवरे यांची धुळेवरून जळगाव येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजकुमार शिंदे यांना पुण्यावरून वाशीम येथे पोलीस अधीक्षक म्हणून पाठवण्यात आले आहे.

शासनाने या बदल्यांमागे कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले असून पोलीस महासंचालकांना पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!