Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्यात खळबळ! भाजप नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा; लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराचा आरोप

राज्यात खळबळ! भाजप नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा; लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराचा आरोप

BJP Corporator : मुंबईलगतच्या मिरा-भाईंदर परिसरात राजकारणाला हादरवणारी घटना समोर आली आहे. लक्सामान या भाजप नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, जुलै २०२२ मध्ये जंगम यांनी तिला मीरारोड येथील त्यांच्या कार्यालयात बोलावले होते. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, महिलेच्या इच्छेविरुद्ध विविध ठिकाणी शारीरिक संबंध ठेवण्यात आले, तसेच या प्रकरणाची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.

भीतीमुळे पीडित महिलेने बराच काळ हा प्रकार गुप्त ठेवला. मात्र मानसिक त्रास असह्य झाल्यानंतर अखेर तिने पोलिसांकडे धाव घेतली आणि संबंधित नगरसेवकाविरोधात तक्रार दाखल केली.

Mira Road पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ६९ आणि ३५१(२) नुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली असून संबंधितावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

दरम्यान, या प्रकरणातील पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!