Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ladki Bahin Yojana : बोगस लाभार्थ्यांचा ‘गेम ओव्हर’! ‘या’ तारखेपर्यंत केवायसी न केल्यास १५०० रुपयांवर फिरेल पाणी

Ladki Bahin Yojana : बोगस लाभार्थ्यांचा ‘गेम ओव्हर’! ‘या’ तारखेपर्यंत केवायसी न केल्यास १५०० रुपयांवर फिरेल पाणी

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ई-केवायसी (eKYC) प्रक्रियेची मुदत आता संपत आली असून, केवळ ८ दिवस शिल्लक राहिले आहेत. ३० एप्रिल २०२६ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित महिलांना मिळणारे १५०० रुपये कायमचे बंद होऊ शकतात.

का वाढवली होती मुदत?
यापूर्वी केवायसीसाठी ३१ मार्च २०२६ ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक महिलांनी तांत्रिक चुका केल्यामुळे किंवा चुकीचे पर्याय निवडल्यामुळे त्यांचा लाभ थांबला होता. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या तांत्रिक अडचणींची दखल घेत महिलांना दुरुस्तीसाठी एक शेवटची संधी म्हणून ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती.

दुरुस्ती आणि पडताळणीची प्रक्रिया:

  • ऑनलाइन पोर्टल: लाभार्थ्यांना योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या अर्जातील त्रुटी सुधारता येतील.
  • व्हेरिफिकेशन: वेबसाईटवर आधार क्रमांक आणि ओटीपी (OTP) द्वारे पडताळणी करणे अनिवार्य आहे.
  • लाभ पुन्हा सुरू होणार: एकदा केवायसी यशस्वी झाली आणि वनविभागाकडून तिची पडताळणी झाली की, पात्र महिलांच्या खात्यात पुन्हा पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.

बोगस लाभार्थ्यांना चाप लावण्यासाठी ‘केवायसी’चे शस्त्र
केवळ गरजू आणि वार्षिक अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांनाच या योजनेचा फायदा मिळावा, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. मात्र, तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अनेक करदात्या महिला आणि सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे, राज्यातील तब्बल १२,७५७ पुरुषांनी महिला असल्याचे भासवून सुमारे २२.९६ कोटी रुपये लाटले आहेत. श्रीमंत आणि अपात्र महिलांकडून ५० टक्के वसुली पूर्ण झाली असली तरी, या ‘घुसखोर’ भावांकडून पैसे परत घेण्याबाबत अद्याप ठोस नियोजन समोर आलेले नाही. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच सरकारने ई-केवायसी सक्तीची केली असून, खऱ्या पात्र भगिनींनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!