Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Girish Mahajan : वाहतूक कोंडीवरून मंत्री गिरीश महाजनांना सुनावणाऱ्या महिलेवर तक्रार दाखल

Girish Mahajan : वाहतूक कोंडीवरून मंत्री गिरीश महाजनांना सुनावणाऱ्या महिलेवर तक्रार दाखल

Girish Mahajan Controversy : वरळी येथे भाजपच्या जन आक्रोश मोर्चादरम्यान वाहतूक कोंडीवरून राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेच्या अडचणीत वाढ झाली आहे. संबंधित महिलेविरोधात अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मोर्चामुळे वरळी परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या कोंडीमुळे संतप्त झालेल्या एका महिलेने थेट मंत्री महाजन यांना “मोर्चा मोकळ्या मैदानात का नेत नाही?” असा सवाल करत पोलिसांनाही जाब विचारला होता.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि अनेकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींकडून टीकाही झाली.

दरम्यान, आता वकील गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेन सदावर्ते यांनी या महिलेविरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शासकीय कामात अडथळा आणणे, सार्वजनिक शांतता भंग करणे आणि चेंगराचेंगरी घडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

माध्यमांशी बोलताना झेन सदावर्ते यांनी “बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्याचा अधिकार या महिलेला कोणी दिला?” असा सवाल उपस्थित केला. या तक्रारीनंतर आता पोलीस पुढे काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!