Maharashtra Board Result : राज्यातील दहावी आणि बारावीच्या निकालाची विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आता याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, बारावीचा (HSC) निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे, तर दहावीचा (SSC) निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागण्याचा अंदाज आहे.
यंदा बारावीच्या परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान, तर दहावीच्या परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान पार पडल्या. दोन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून गुणांचे संकलनही अंतिम टप्प्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ५ मे २०२६ पर्यंत बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो, तर १५ मेपूर्वी दहावीचा निकाल लागू शकतो.
यावर्षी बारावीच्या परीक्षेला सुमारे १४ लाख, तर दहावीच्या परीक्षेला सुमारे १६ लाख विद्यार्थी बसले होते. सध्या गुणपत्रिकांची छपाई सुरू असून, निकालानंतर सुमारे एका महिन्याने विद्यार्थ्यांना अधिकृत गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.
निकाल कुठे आणि कसा पाहाल?
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org (बारावी)
sscresult.mkcl.org (दहावी)
mahahsscboard.in
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा सीट नंबर आणि आईचे नाव आवश्यक असणार आहे.


