Today मंगळवार, 28th एप्रिल 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rohit Pawar: रोहित पवारांकडून पुण्यातील CID कार्यालयातील रिकाम्या खुर्चीला निवेदन; अजित पवारांच्या अपघाताच्या तपासावर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

Rohit Pawar: रोहित पवारांकडून पुण्यातील CID कार्यालयातील रिकाम्या खुर्चीला निवेदन; अजित पवारांच्या अपघाताच्या तपासावर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

Rohit Pawar: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाला तीन महिने पूर्ण झाले तरीही तपासाचे चक्र गतीने फिरत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी (२८ एप्रिल) रोहित पवार पुण्याच्या सीआयडी (CID) कार्यालयात धडकले. मात्र, तिथे एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत चक्क रिकाम्या खुर्चीलाच आपले निवेदन सादर करून सरकारचा निषेध नोंदवला.

तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर ओढले ताशेरे
२८ जानेवारी रोजी झालेल्या त्या दुर्दैवी विमान अपघाताचा तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी आज तिसऱ्यांदा या कार्यालयात चकरा मारत आहे. पहिल्या वेळी तीन अधिकारी भेटले, दुसऱ्या वेळी एक आणि आज तर कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नाही. महत्त्वाच्या तपासापेक्षा अधिकाऱ्यांना कदाचित आयपीएलचे सामने पाहण्यात जास्त रस असावा. आता मला पुराव्याची कागदपत्रे गेटवरच्या सुरक्षारक्षकाकडेच देऊन जावी लागतील की काय, अशी परिस्थिती आहे.

रिकाम्या खुर्चीचे फोटो आणि उपरोधिक वार
कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या पाहून रोहित पवारांनी त्याचे फोटो काढले आणि यंत्रणेच्या निष्काळजीपणावर उपरोधिक टीका केली. एका मोठ्या नेत्याच्या अपघाताचा तपास इतका दुर्लक्षित राहणे हे लोकशाहीसाठी खेदजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘कलम १८०’ अन्वये जबाब नोंदवा
अधिकारी हजर नसले तरी रोहित पवारांनी आपले लेखी निवेदन तेथे ठेवले आहे. या निवेदनात त्यांनी महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. अजितदादांच्या अपघाताबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती किंवा कारवाई समोर न आल्याने नागरिक आणि राजकीय वर्तुळात संशयाचे वातावरण आहे. “जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही,” असा निर्धार रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे आता तपास यंत्रणा आणि राज्य सरकारवर दबाब वाढण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!