Today मंगळवार, 28th एप्रिल 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मराठीतर रिक्षाचालकांसाठी तात्पुरता दिलासा! मराठी शिकण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; पण कागदपत्रांच्या तपासणीचा फास कायम

मराठीतर रिक्षाचालकांसाठी तात्पुरता दिलासा! मराठी शिकण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; पण कागदपत्रांच्या तपासणीचा फास कायम

Marathi Language Deadline : राज्यातील रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाबाबत राज्य सरकारने काहीसा लवचिक पवित्रा घेतला असला, तरी तपासणी मोहिमेचा कडाका कायम राहणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे की, रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची वाढीव मुदत देण्यात आली आहे. मात्र, 1 मे पासून सुरू होणाऱ्या अंमलबजावणी मोहिमेत इतर कोणत्याही तांत्रिक त्रुटी आढळल्यास चालकांवर कठोर कारवाई केली जाईल.

1 मे पासून ‘एनफोर्समेंट ड्राईव्ह’ सुरूच राहणार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले की, 1 मे पासून परिवहन विभाग आपली विशेष तपासणी मोहीम (Enforcement Drive) थांबवणार नाही. रिक्षाचालकांची सातत्याने तपासणी केली जाईल. जरी मराठी भाषेसाठी 15 ऑगस्टपर्यंतचा ‘ग्रेस पिरियड’ देण्यात आला असला, तरी ज्या चालकांकडे वैध कागदपत्रे, परवाने किंवा फिटनेस प्रमाणपत्रे नसतील, त्यांच्यावर कोणतीही दयामाया न दाखवता त्वरित कारवाई केली जाईल.

RTO कडून मराठी प्रशिक्षणाची सोय
ज्या अ-मराठी रिक्षाचालकांना मराठी येत नाही, त्यांना ही भाषा शिकण्यासाठी शासनाने सवलत दिली आहे. 1 मे ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आणि इतर संस्थांच्या माध्यमातून चालकांसाठी मराठी शिकवण्याची विशेष व्यवस्था केली जाणार आहे. 15 ऑगस्टनंतर या सवलतीबाबत पुनर्विचार केला जाईल. मात्र, तोपर्यंत चालकांनी ही भाषा आत्मसात करावी, अशी सरकारची अपेक्षा आहे.

“इतर राज्यांत चालते, मग महाराष्ट्रात का नाही?”: संजय राऊत
या निर्णयावर शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. त्यांनी इतर राज्यांतील भाषिक अटींचा दाखला देत सरकारला आणि विरोधकांना धारेवर धरले. राऊत म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये बंगाली, गुजरातमध्ये गुजराती, कर्नाटकात कन्नड आणि पंजाबमध्ये पंजाबी भाषा सक्तीची आहे. मग महाराष्ट्रात मराठीची अट घातल्यावर अडचण काय? केवळ व्होट बँक जपण्यासाठी मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही.”

चालकांच्या फायद्याचाच निर्णय
मराठी भाषेची अट ही केवळ सक्ती नसून ती चालकांच्या व्यवसायासाठी फायद्याची असल्याचेही संजय राऊत यांनी नमूद केले. “स्थानिक लोकांची भाषा अवगत असेल, तर प्रवाशांशी संवाद साधणे सोपे होते आणि व्यवसाय वाढण्यास मदत होते. त्यामुळे ही अट अंतिमतः चालकांच्याच हिताची आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, 16 ऑगस्टपासून मराठी न येणाऱ्या चालकांवर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!