Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bachchu Kadu : बच्चू कडू मोठा निर्णय घेणार; ‘प्रहार’ पक्ष शिंदेसेनेत विलीन होणार?

Bachchu Kadu : बच्चू कडू मोठा निर्णय घेणार; ‘प्रहार’ पक्ष शिंदेसेनेत विलीन होणार?

Bachchu Kadu : राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडण्याची शक्यता असून, माजी मंत्री बच्चू कडू आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यांच्या प्रहार पक्षाच्या प्रहार पक्ष शिंदे गटाच्या शिवसेनेत विलिनीकरणाबाबत सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेची संधी देण्याच्या बदल्यात प्रहार पक्ष विलीन करण्याची अट घातल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कडू यांच्यासमोर मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान, काल रात्री कडू आणि शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत “पक्ष विलीन न करता विधानपरिषदेची जागा द्यावी” अशी भूमिका कडू यांनी मांडल्याची माहिती समोर येत आहे.

या सर्व घडामोडींनंतर बच्चू कडू आज दुपारी 12 वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेणार असून, त्यात ते अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. प्रहार पक्षाचे भवितव्य आणि कडूंचा पुढील राजकीय मार्ग काय असणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!