Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BJP Candidate List : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र; ५ नव्या चेहऱ्यांना विधान परिषदेवर संधी, दिग्गजांना डच्चू

BJP Candidate List : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र; ५ नव्या चेहऱ्यांना विधान परिषदेवर संधी, दिग्गजांना डच्चू

BJP Candidate List : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची घोषणा करत पुन्हा एकदा ‘धक्कातंत्र’ वापरले आहे. पक्षाने यावेळी नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवत ५ उमेदवारांना संधी दिली असून, अनेक विद्यमान नेत्यांना डच्चू दिला आहे.

भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार, विवेक कोल्हे, आणि संजय भेंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, विद्यमान आमदार संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर, आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांना यावेळी पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले आहे.

या उमेदवारी यादीत भाजपने विभागीय समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागांना प्रतिनिधित्व देण्यात आले असले तरी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राला यावेळी स्थान मिळालेले नाही.

दरम्यान, विधान परिषदेच्या ६ जागांसाठी भाजपची ही यादी महत्त्वाची मानली जात आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देत पक्षाने आगामी राजकीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखल्याचे दिसत आहे.

निवडणूक कार्यक्रम (2026)

अधिसूचना : २३ एप्रिल
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : ३० एप्रिल
छाननी : २ मे
माघार : ४ मे
मतदान : १२ मे (सकाळी ९ ते दुपारी ४)
मतमोजणी : १२ मे सायं. ५ वाजता
प्रक्रिया पूर्ण : १३ मे २०२६

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!