Women Reservation Bill : राज्यातील महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या हालचालींना वेग आला असून सरकारकडून मोठं पाऊल उचलण्याची तयारी सुरू आहे. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्य सरकार एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हे विशेष अधिवेशन मे महिन्यात घेण्याची शक्यता आहे. मात्र, याची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनात सर्वपक्षीय आमदारांना महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडण्याची संधी दिली जाणार आहे. राज्य सरकारच्या या पुढाकाराकडे महिलांसाठी महत्त्वाच्या निर्णयाच्या दिशेने एक मोठं पाऊल म्हणून पाहिलं जात आहे.


