Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Plane Crash : खेळाडूंना घेऊन जाणारे विमान जंगलात कोसळले; पायलटसह ५ जणांचा मृत्यू

Plane Crash : खेळाडूंना घेऊन जाणारे विमान जंगलात कोसळले; पायलटसह ५ जणांचा मृत्यू

Plane Crash : सेसना ४२१ सी हे छोटे विमान अमेरिकेतील टेक्सासमधील विम्बर्ली परिसरात झाडांवर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात पायलटसह चार पिकलबॉल खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील पिकलबॉल समुदायावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अमॅरिलो येथून न्यू ब्रॉनफेल्स प्रादेशिक विमानतळाकडे जात होते. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास विमान घनदाट जंगलातील झाडांवर कोसळले आणि त्यानंतर स्फोट झाला. अपघातात विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

टेक्सासमधील सार्वजनिक सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत पायलट आणि चार प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सध्या केंद्रीय तपास यंत्रणा अपघाताच्या कारणांचा शोध घेत आहेत.

विमानातील सर्व प्रवासी न्यू ब्रॉनफेल्स येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘क्रँकी पिकल’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात होते. या दुर्दैवी घटनेनंतर आयोजकांनी स्पर्धा रद्द करून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.

अपघातापूर्वी परिसरात खराब हवामान होते. तसेच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधताना विमान अनियंत्रित झाल्याचे संकेत मिळाले होते. काही वेळानंतर विमान रडारवरून गायब झाल्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.

अमॅरिलो पिकलबॉल क्लबचे अध्यक्ष डॅन डायर यांनी मृत खेळाडूंना श्रद्धांजली वाहताना, ते सर्व अत्यंत गुणी आणि समर्पित खेळाडू असल्याचे सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!