Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

LPG Price Hike: महागाईचा भडका! व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मोठी वाढ; आता घरगुती गॅसही महागणार?

LPG Price Hike: महागाईचा भडका! व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मोठी वाढ; आता घरगुती गॅसही महागणार?

LPG Price Hike: आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या अडचणीत आता आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली असून, आता घरगुती एलपीजी सिलेंडरचे दरही वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे ‘किचन बजेट’ पूर्णपणे कोलमडण्याची भीती आहे.

व्यावसायिक गॅसचा ‘दणका’
१ मे रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेलिंग आणि बाहेरील खाद्यपदार्थांवर होणार आहे. खानावळी आणि हॉटेलचे दर वाढणार असल्याने बाहेर जेवणाऱ्या नोकरदार वर्गाला आणि विद्यार्थ्यांना आता खिसा जास्त रिकामा करावा लागणार आहे.

घरगुती सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत ४० ते ५० रुपयांची वाढ होऊ शकते. सध्या सिलेंडरचे दर १००० रुपयांच्या उंबरठ्यावर असताना, ही संभाव्य वाढ गृहिणींसाठी चिंतेची बाब ठरणार आहे. गेल्या १५ वर्षांत गॅसच्या किमती दुपटीहून अधिक झाल्या असून, वाढत्या महागाईमुळे पुन्हा एकदा ‘चूल आणि सरपण’ असे दिवस येतात की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

दरवाढीमागील कारण काय?

  • जागतिक बाजारपेठ: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणारे चढ-उतार स्थानिक इंधन दरांवर परिणाम करत आहेत.
  • कर आणि उपकर: सरकारने आतापर्यंत काही प्रमाणात कर कपात करून दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र जागतिक स्तरावरील दबावामुळे आता दरवाढ अपरिहार्य असल्याचे दिसते.

पंतप्रधान कार्यालयाकडून किंवा पेट्रोलियम मंत्रालयाकडून अद्याप घरगुती गॅस वाढीबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी व्यावसायिक गॅसच्या दरात झालेल्या बदलामुळे सर्वसामान्यांमध्ये कमालीची धास्ती पसरली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!