Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rahuri Bypoll 2026 : राहुरीत भाजपची दमदार मुसंडी; तिसऱ्या फेरीअखेर अक्षय कर्डिले १४,७११ मतांनी आघाडीवर

Rahuri Bypoll 2026 : राहुरीत भाजपची दमदार मुसंडी; तिसऱ्या फेरीअखेर अक्षय कर्डिले १४,७११ मतांनी आघाडीवर

Rahuri Bypoll 2026 : राज्याचे लक्ष लागून असलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी दमदार आघाडी घेतली आहे. सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीनंतर तिसऱ्या फेरीअखेर कर्डिले तब्बल १४,७११ मतांनी आघाडीवर असून राहुरीत कमळ फुलण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच अक्षय कर्डिले यांनी आघाडी कायम ठेवत प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने मागे टाकले आहे.

पहिल्या फेरीअखेर मिळालेली मते :

भाजप – अक्षय कर्डिले : ४,९८८
राष्ट्रवादी (SP) – गोविंद मोकाटे : ७२२
वंचित – संतोष चोळके : ३५६
अपक्ष – रावसाहेब खेवरे : १०९

पहिल्या फेरीत कर्डिले ४,२६६ मतांनी आघाडीवर होते.

दुसऱ्या फेरीअखेर :

अक्षय कर्डिले : ११,०७१
गोविंद मोकाटे : १,४३४
संतोष चोळके : ८१२
रावसाहेब खेवरे : ३७५

दुसऱ्या फेरीअखेर आघाडी वाढून ९,६३७ मतांवर पोहोचली.

तिसऱ्या फेरीअखेर :

अक्षय कर्डिले : १६,८५२
गोविंद मोकाटे : २,१४१
संतोष चोळके : १,०२२
रावसाहेब खेवरे : ७८४

तिसऱ्या फेरीअखेर कर्डिले यांनी १४,७११ मतांची मोठी आघाडी घेतली आहे. तर नोटाला १६७ मते मिळाली आहेत.

विशेष म्हणजे आज अक्षय कर्डिले यांचा वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांमध्ये दुहेरी उत्साहाचे वातावरण आहे. समर्थकांनी त्यांना आतापासूनच ‘विजयी आमदार’ म्हणून शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

निवडणूक प्रशासनाने मतमोजणीसाठी २० टेबलांची व्यवस्था केली असून एकूण २७ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे. मतदारसंघात ५६.२० टक्के मतदान झाले होते. प्रशासनाच्या अंदाजानुसार दुपारपर्यंत राहुरीचा नवा आमदार कोण हे स्पष्ट होणार आहे.

सध्या मतमोजणी केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त असून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. आता उर्वरित फेऱ्यांत विरोधक पिछाडी भरून काढणार की कर्डिले विजयाकडे वाटचाल कायम ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!