Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime : पुण्यात कॅबिनेट मंत्र्यांच्या OSD कडून पत्नीला ठार करण्याचा प्रयत्न; मुलालाही मारहाण

Pune Crime : पुण्यात कॅबिनेट मंत्र्यांच्या OSD कडून पत्नीला ठार करण्याचा प्रयत्न; मुलालाही मारहाण

Pune Crime : पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कॅबिनेट मंत्र्यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाने (OSD) पत्नीचा गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. एवढंच नाही तर भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या स्वतःच्या मुलालाही बॅटने बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.

विजय कारंडे असे आरोपी OSD चे नाव असून, या प्रकरणी आधी अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हा गुन्हा पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. संबंधित घटना पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथील राहत्या घरी घडली.

या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात विजय कारंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात त्यांची ३० वर्षीय पत्नी आणि मुलगा जखमी झाले असून पत्नीवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी हा प्रकार घडला. आरोपी विजय कारंडे मोबाईलवर चॅटिंग करत असताना पत्नीने त्यांना त्याबाबत विचारणा केली. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.

वाद विकोपाला गेल्यानंतर विजय कारंडे यांनी पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी आईला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुलालाही त्यांनी क्रिकेट बॅटने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

इतक्यावरच न थांबता त्यांनी पत्नीचा गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. जखमी महिलेवर सध्या उपचार सुरू असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

या घटनेनंतर संबंधित मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!