Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime News : प्रमोशननंतर दुसऱ्याच दिवशी अटक; लाचखोर API वैशाली तोटेवार निलंबित, मुंबई बदलीचा आदेशही रद्द

Pune Crime News : प्रमोशननंतर दुसऱ्याच दिवशी अटक; लाचखोर API वैशाली तोटेवार निलंबित, मुंबई बदलीचा आदेशही रद्द

Pune Crime News : पुणे पोलिस दलातील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तब्बल २८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्यांना रंगेहाथ पकडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, या कारवाईच्या अवघ्या एक दिवस आधीच त्यांची पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती झाली होती आणि त्यांची मुंबई येथे बदलीही करण्यात आली होती.

आता या प्रकरणानंतर त्यांना कार्यमुक्त करण्याचा आदेशही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रमोशन आणि बदलीच्या आनंदावर एका क्षणात विरजण पडल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

वैशाली तोटेवार या पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होत्या. त्यांच्या ताब्यात जमिनीच्या वादासंदर्भातील एक तक्रार अर्ज चौकशीसाठी आला होता. या प्रकरणात तक्रारदाराकडून अनुकूल अहवाल देण्यासाठी त्यांनी ३० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराकडून सुरुवातीला २ लाख रुपये स्वीकारल्यानंतर, उर्वरित २८ लाख रुपये घेताना ACB ने सापळा रचून त्यांना पकडलं. पुण्यातील बंडगार्डन परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली.

या घटनेनंतर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. कारण, कारवाईच्या आदल्या दिवशीच तोटेवार यांना बढती देण्यात आली होती आणि मुंबईत नवीन जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्यांना पुणे पोलिस दलातून कार्यमुक्तही करण्यात आलं होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी त्या लाचखोरीच्या जाळ्यात अडकल्या.

या प्रकरणामुळे पोलिस दलातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, ACB कडून पुढील तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!