Today मंगळवार, 26th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महाराष्ट्र हादरला! ५५ वर्षीय भोंदू बाबाचा १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

महाराष्ट्र हादरला! ५५ वर्षीय भोंदू बाबाचा १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

Palghar Crime : अघोरी पूजा आणि गावरान उपचाराच्या बहाण्याने एका ५५ वर्षीय भोंदू बाबाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पालघर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पीडित मुलीवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीला मासिक पाळीदरम्यान रक्तस्त्राव थांबत नसल्याने तिच्यावर ‘गावरान उपचार’ करण्यासाठी आरोपीकडे नेले होते. आरोपी शिवराम परशु सावर (५५) याने या बहाण्याने ३ मे २०२६ रोजी आपल्या इको कारने फिर्यादी, पीडित मुलगी आणि तिचे काका यांना खताडपाडा येथून चरी पावण (ता. डहाणू) येथे नेले.

४ मे २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीला ‘औषध देण्याच्या’ बहाण्याने कारमधून उतरवून जंगलात नेले. तेथे त्याने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. यावेळी तिला “कोणाला सांगितलेस तर मारून टाकीन” अशी धमकीही दिली.

माहिती मिळताच कासा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपी शिवराम सावर याला अटक केली. या प्रकरणी पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ६४(१), ६५(१), ३५१(२) आणि पोक्सो कलम ४(२), ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पालघर पोलिसांकडून सुरू आहे.

ही घटना नाशिक खरात प्रकरणानंतर राज्यात महिलांवरील अत्याचार आणि भोंदू बाबांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट करते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!