Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये बाळ पळवणारी महिला गजाआड; बॅगेतील ‘ते’ साहित्य पाहून पोलीसही चक्रावले

Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये बाळ पळवणारी महिला गजाआड; बॅगेतील ‘ते’ साहित्य पाहून पोलीसही चक्रावले

Pune Crime: पिंपरी-चिंचवडमधील काळभोर नगर परिसरातून एक धक्कादायक आणि पालकांची झोप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. लहान मुले चोरण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका संशयित महिलेला स्थानिक नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या महिलेकडे आढळलेल्या साहित्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ
मिळालेल्या माहितीनुसार, काळभोर नगर भागात ही महिला संशयास्पदरीत्या वावरत होती. तिची नजर लहान मुलांवर असल्याचे काही जागरूक नागरिकांच्या लक्षात आले. संशय बळावल्याने नागरिकांनी तिला हटकले आणि तिची चौकशी केली. मात्र, तिच्या उत्तरांनी समाधान न झाल्याने संतापलेल्या जमावाने तिला चोप दिला आणि तातडीने पिंपरी पोलिसांना पाचारण केले.

बॅगेतील ‘ते’ साहित्य पाहून पोलीसही चक्रावले
पोलिसांनी या महिलेची झडती घेतली असता तिच्या बॅगेत अत्यंत भयानक वस्तू सापडल्या. यामध्ये प्रामुख्याने तीक्ष्ण चाकू, गुंगीचे औषध, स्प्रे या वस्तूंचा समावेश होता. या साहित्याचा वापर ती लहान मुलांना बेशुद्ध करण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी करणार होती, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. हे घातक साहित्य पाहून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता
पिंपरी पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले असून तिची कसून चौकशी सुरू आहे. ही महिला एकटीच काम करत होती की तिच्यामागे बाळ चोरणारी एखादी मोठी आंतरराज्यीय टोळी सक्रिय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. तिचे आणखी काही साथीदार शहरात वावरत आहेत का, या दृष्टीनेही शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे सावट पसरले आहे. आपल्या लहान मुलांना घराबाहेर किंवा गर्दीच्या ठिकाणी एकटे सोडू नका. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!