Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nasrapur Case : चिमुकलीच्या हत्येचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला! नराधमाने मृत्यूची खात्री करण्यासाठी केलं ‘हे’ अघोरी कृत्य

Nasrapur Case : चिमुकलीच्या हत्येचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला! नराधमाने मृत्यूची खात्री करण्यासाठी केलं ‘हे’ अघोरी कृत्य

Nasrapur Case : पुण्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. याप्रकरणी ससून रुग्णालयाचा प्राथमिक शवविच्छेदन (Post-Mortem) अहवाल समोर आला असून, त्यातील तपशील अत्यंत अमानुष आणि संतापजनक आहेत. ६५ वर्षीय नराधम भीमराव कांबळे याने चिमुकलीसोबत केलेल्या क्रूरतेची सीमा ओलांडल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

मृत्यूची खात्री करण्यासाठी छातीवर प्रहार
वैद्यकीय अहवालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने चिमुकलीच्या मृत्यूबद्दल खात्री करण्यासाठी तिच्या छातीवर जोरात बुक्की मारली होती. नराधमाने केवळ अत्याचार करूनच थांबला नाही, तर मुलगी जिवंत आहे की मेली हे पाहण्यासाठी त्याने तिच्यावर शारीरिक प्रहारही केले.

अत्याचाराचा क्रूर प्रकार
आरोपीने चिमुकलीच्या तोंडात पायमोजा आणि कपड्याचा बोळा कोंबला होता. तसेच तिचे नाक आणि तोंड दाबल्यामुळे श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाला. चिमुकलीच्या चेहऱ्यावर ओरखड्यांच्या खुणा आढळल्या आहेत. तसेच तिच्या गुप्तांगाला गंभीर इजा झाल्याचेही वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. नराधमाने पीडितेला ज्या गोठ्यात नेले होते, तिथेच तिच्यावर नरक यातना लादल्या.

पुढील तपास आणि अंतिम अहवाल
ससून रुग्णालयातील तज्ज्ञांनी ‘इन कॅमेरा’ पद्धतीने ही उत्तरीय तपासणी पूर्ण केली आहे. प्राथमिक अहवाल पोलिसांना सोपवण्यात आला असून, अधिक सखोल तपासासाठी चिमुकलीचे अंतर्गत अवयव (Viscera) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत (FSL) पाठवण्यात आले आहेत. लॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ससून रुग्णालय पोलिसांना अंतिम अहवाल सादर करेल.

आरोपीवर कठोर कारवाईची मागणी
या प्राथमिक अहवालामुळे आरोपी भीमराव कांबळेविरुद्धचा पुरावा अधिक भक्कम झाला आहे. पोलिसांनी या अहवालाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, अशा नराधमाला कठोरतम शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!