Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Politics: गुपचूप गेम! निवडणुकीच्या धामधुमीत भाजपने साधला डाव; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मोठा धक्का

Maharashtra Politics: गुपचूप गेम! निवडणुकीच्या धामधुमीत भाजपने साधला डाव; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मोठा धक्का

Maharashtra Politics: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने अत्यंत सावधपणे चाल खेळत आपल्या मित्रपक्षांना मोठा राजकीय धक्का दिला आहे. राज्यातील महामंडळ वाटपावरून महायुतीत धुसफूस सुरू असतानाच, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी अॅड. संजय पुराणिक यांची वर्णी लावून भाजपने या प्रतिष्ठेच्या पदावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

दोन्ही मित्रपक्षांच्या दाव्यांना केराची टोपली
बाल हक्क आयोगाचे अध्यक्षपद काबीज करण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात मोठी चढाओढ सुरू होती. मात्र, भाजपने या दोन्ही मित्रपक्षांना बाजूला सारत आपल्या हक्काच्या माणसाची नियुक्ती करण्यात यश मिळवले आहे. माजी अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे हे पद आपल्याकडेच राहावे, असा एकनाथ शिंदे यांच्या गटाचा आग्रही पवित्रा होता. तथापी, महिला आयोगाच्या धर्तीवर बाल हक्क आयोगावरही आपला ताबा असावा, यासाठी राष्ट्रवादीच्या गोटातून मोठ्या हालचाली सुरू होत्या.

गुप्तता पाळत भाजपचा ‘मास्टरस्ट्रोक’
३ मे २०२५ रोजी सुशीबेन शहा यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद चर्चेत होते. विशेष म्हणजे, मित्रपक्षांकडून होणारा विरोध किंवा नाराजी टाळण्यासाठी भाजपने अत्यंत गुप्त पद्धतीने संजय पुराणिक यांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली. पुराणिक हे संघ परिवारातील निष्ठावान चेहरा मानले जातात. या नियुक्तीद्वारे भाजपने महायुतीमध्ये आपलाच शब्द अंतिम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सुशीबेन शहा यांनी शिवसेनेत प्रवेश करूनही भाजपने त्यांना पुन्हा संधी न देता हे पद स्वतःच्या ताब्यात घेतल्याने, महायुतीत ‘मोठा भाऊ’ कोण, याचे स्पष्ट संकेत राजकीय वर्तुळात गेले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!