Nilesh Lanke : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
मागील दोन ते तीन दिवसांपासून त्यांच्यावर अहिल्यानगरमध्ये उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारांसाठी पुण्याकडे रवाना करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्यासोबत असून पुण्यात तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होणार आहेत. खासदार लंके यांच्या प्रकृतीबाबतची बातमी समोर येताच समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


