Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Suvendu Adhikari: सुवेंदू अधिकारी यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड; उद्या घेणार बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

Suvendu Adhikari: सुवेंदू अधिकारी यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड; उद्या घेणार बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

Suvendu Adhikari: पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांची नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली असून, ते राज्याचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळतील. २९३ पैकी तब्बल २०७ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवून भाजपने बंगालमध्ये सत्तांतर घडवून आणले आहे.

शाह आणि माझी यांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब
कोलकाता येथे पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांची विशेष उपस्थिती होती. प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला सर्व नवनिर्वाचित आमदारांनी एकमुखाने पाठिंबा दिला.

अमित शाह यांचा ‘दीदीं’वर निशाणा
विजयी सोहळ्याला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, “हा विजय अभूतपूर्व आहे. राज्यातील २३ जिल्ह्यांपैकी ९ जिल्ह्यांमध्ये तृणमूल काँग्रेसला खातेही उघडता आले नाही, हा जनमताचा मोठा कौल आहे. आता आम्ही बंगालच्या सीमा एका अभेद्य किल्ल्यासारख्या सुरक्षित करू आणि ‘सोनार बांगला’चे स्वप्न सत्यात उतरवू.” विशेषतः भवानीपूरच्या मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

राजकीय वारसा आणि समर्पण
माजी केंद्रीय मंत्री शिशिर अधिकारी यांचे पुत्र असलेल्या सुवेंदू यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी समर्पित केले आहे. अविवाहित राहिलेल्या अधिकारी यांच्या कुटुंबात त्यांचे दोन्ही भाऊ, दिब्येंदू आणि सौम्येंदू हे देखील राजकारणात सक्रिय आहेत. दरम्यान, सुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी सोहळा उद्या, शनिवारी सकाळी ११:०० वाजता पार पडणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!