Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सुट्ट्यांमध्ये तुम्ही ट्रीप प्लॅन करताय? तर ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या; सुरक्षा किटमध्ये नक्की करा समावेश…

सुट्ट्यांमध्ये तुम्ही ट्रीप प्लॅन करताय? तर ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या; सुरक्षा किटमध्ये नक्की करा समावेश…

उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच आपल्यापैकी अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. काहींना थंड पर्वतीय वाऱ्याचा आनंद घ्यायचा असतो, तर काही जण समुद्रकिनाऱ्यावर किंवा नवीन शहरात फिरायला जातात. पण कडक ऊन आणि वाढत्या तापमानात थोडासा निष्काळजीपणासुद्धा संपूर्ण ट्रीप खराब करू शकते. जर तुम्ही मित्रांसोबत उन्हाळ्याच्या सहलीची योजना आखत असाल, तर काही चुका टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

फिरताना सर्वात मोठी चूक म्हणजे खूप कमी पाणी पिणे. उष्णतेमुळे शरीरातील पाणी लवकर कमी होते, ज्यामुळे अशक्तपणा, चक्कर आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, तुमच्या प्रवासादरम्यान नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवा. ओआरएस, नारळाचे पाणी, फळांचा रस आणि इलेक्ट्रोलाइट पेये यांसारखे पर्याय देखील चांगले आहेत. सनस्क्रीन न लावता उन्हात चालणे धोकादायक असू शकते. तीव्र अतिनील किरणे त्वचेला नुकसान पोहोचवतात आणि सनबर्न किंवा टॅनिंगचा धोका वाढवू शकतात. म्हणून, तुमच्या सुरक्षा किटमध्ये सनस्क्रीन, कोरफड जेल (ॲलोवेरा जेल) आणि आफ्टर-सन लोशन यांचा समावेश नक्की करा.

जर तुम्ही जास्त वेळ बाहेर राहणार असाल, तर सनग्लासेस आणि टोपी देखील सोबत घ्या. बरेच लोक फॅशनच्या नादात प्रवासात हेवी किंवा घट्ट कपडे घालतात, ज्यामुळे उष्णता अधिकच वाढते. उन्हाळ्यातील प्रवासासाठी नेहमी हलक्या रंगाचे सुती कपडे निवडा. सैल आणि आरामदायक कपड्यांमुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.

तुमच्या फोन चार्जर आणि पॉवर बँकची काळजी घ्या

जर तुम्ही प्रवास करत असाल, तर तुमचा फोन चार्जर आणि पॉवर बँक पॅक करायला विसरू नका. लोकेशन ट्रॅकिंग, फोटो काढणे आणि ऑनलाईन पेमेंटमुळे प्रवासादरम्यान मोबाईल फोनची बॅटरी लवकर संपू शकते. अशा परिस्थितीत पॉवर बँक खूप उपयुक्त ठरते. शक्यतो, ऑनलाईन पेमेंटच्या अडचणींतून सुटका करून घेण्यासाठी रोख रक्कमच जवळ बाळगा.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!